गडचिरोलीत दुर्मीळ 'हार्लेक्क्विन बेबी'चा जन्म

मार्च २०२६
गडचिरोली येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात २८ मार्च रोजी 'हार्लेक्क्विन इचथिओसिस' (Harlequin Ichthyosis) या अत्यंत दुर्मीळ जनुकीय आजाराने ग्रस्त बालकाचा जन्म झाला आहे. वैद्यकीय शास्त्रानुसार, साधारणतः तीन लाख प्रसूतींमागे एखादेच असे प्रकरण आढळते.

'हार्लेक्क्विन इचथिओसिस' म्हणजे काय?

स्वरूपा: हा त्वचेच्या निर्मितीवर परिणाम करणारा एक अनुवांशिक (Genetic) विकार आहे.

कारणे: हा विकार 'एबीसीए-१२' (ABCA12) जनुकातील उत्परिवर्तनामुळे (Mutation) होतो.

लक्षणे:
बाळाची त्वचा जाड, कठीण आणि प्लेटसारखी असते.
शरीरावर खोल भेगा असतात.
पापण्या (एक्ट्रोपियन) आणि ओठ (एक्ट्लॅबियम) बाहेरच्या बाजूला उलटलेले असतात.
यामुळे हालचालींवर मर्यादा येतात आणि श्वास घेण्यास अडचण निर्माण होऊ शकते.

बाळाची सद्यस्थिती

NICU उपचार सुरू

आरमोरी तालुक्यातील एका महिलेची ही पहिलीच प्रसूती असून बाळाचे वजन १.८ किलोग्रॅम आहे. सध्या बाळावर विशेष अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अशा प्रकरणांमध्ये जगण्याची शाश्वती कमी असल्याने वैद्यकीय पथक बाळावर बारकाईने लक्ष ठेवून आहे.